कुंभारगाव येथील प्रसिद्ध कापड व्यापारी पांडुरंग पतंगे यांचे दुःखद निधन.


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कुंभारगाव येथील प्रसिद्ध कापड व्यापारी कै. पांडुरंग काशिनाथ पतंगे यांचे बुधवार दि 18 ऑक्टोबर रोजी पहाटे वयाच्या 84 व्या वर्षी दुःखद निधन झाले. ते आप्पा या नावाने परिचित होते.

कापड व्यापारी व ग्रामीण कथाकार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ व पुतणे असा मोठा परिवार आहे.

काल दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन शुक्रवार दि.20/10/2023 रोजी सकाळी 9 वाजता कुंभारगाव ता पाटण येथील वैकुंठधाम येथे होणार आहे.