ढेबेवाडी परिसरातील दुर्गा देवी मंडळे सज्ज ; आज देवीची प्रतिष्ठापना


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

आज विभागातील सर्व दुर्गादेवी मंडळे दुर्गादेवीच्या प्रतिष्ठापनेसाठी सज्ज झाली आहेत. सगळीकडे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. कुंभारवाड्यात आकर्षक रंगकाम केलेल्या व विविध रूपातील देवीच्या मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
कुंभारगाव येथील कुंभारवाड्यात देवीच्या आकर्षक मूर्ती तयार करणारे कलाकार प्रकाश कुंभार यांनी रंगकाम केलेल्या विविध रूपातील आकर्षक देवीच्या मूर्ती विभागातील कुंभारगाव, तळमावले मानेगांव, ढेबेवाडी परिसरात प्रसिद्ध आहेत.