श्री लक्ष्मीदेवी हायस्कूल कुंभारगाव विद्यालयात विविध स्पर्धा संपन्न.


कुंभारगांव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
कुंभारगांव ता पाटण येथील श्री लक्ष्मीदेवी हायस्कूल विद्यालयात चित्रकला, रांगोळी, पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये 29 माता पालक सहभागी झाल्या होत्या. तृणधान्य आधारीत पाककृती स्पर्धेमध्ये ढोसा,नाचणीचा केक, बाजरीची भाकरी असे अनेक पदार्थ तयार केले होते. 

यावेळी खालील स्पर्धक विजेते ठरले यामध्ये रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कु सुचिता पोतदार, द्वितीय कु गायत्री झेंडे, तृतीय कु गार्गी चव्हाण, चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कु आरजू मुल्ला, द्वितीय स्वरांजली कराळे, तृतीय सर्वेश बागल, तर पाककला स्पर्धेत प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत प्रथम क्रमांक साधना अजित देसाई,(तृनधान्याचे ढोसे) द्वितीय वैशाली अशोक देसाई,(वरी, शाबूची इडली, तृन धान्याचीअबोळी) तृतीय तृप्ती संदीप पवार (कडधान्य भेळ) चतुर्थ अनु हणमंत पुजारी (नाचणीचे मोदक, वडी) पाचवे वंदना सुनील चाळके (नाचणीचा केक) या स्पर्धकांनी विजय पटकावला.यावेळी शिक्षक-पालक सहविचार सभा भरवण्यात आली होती. या सभेसाठी बहुसंख्येने पालक हजर होते. यावेळी अशोक महाबळ सरांनी प्रस्तावना केली तसेच कुंभारगांव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जयेंद्र माने,सामाजिक कार्यकर्ते विजयसिँह चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समिना मुल्ला यांनी पोषण आहाराविषयी माहिती सांगितली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कराळे बी.एम.यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासाबद्दल माहिती सांगितली या कार्यक्रमाचे आभार संभाजी घोरपडे सरांनी मानले. हायस्कुल च्या मुख्याध्यापिका कराळे बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.