'झी टाॅकीज’ वर सादर होणार गुढे येथील काळंबादेवीची गाथा


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
पाटण तालुक्यातील वरची शिबेवाडी गुढे येथील नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या श्री काळंबादेवीची गाथा झी टाॅकीज या वाहिनीवर वर दिसणार आहे. झी टाॅकीज प्रस्तुत "गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा" या कार्यक्रमात नवरात्री विशेष मध्ये साध्वी अनुराधा दिदी यांचा कथा महोत्सव होत आहे. या मध्ये देवींची महती सांगितली जाणार आहे. निसर्गरम्य वातावरण असलेल्या श्री क्षेत्र शिबेवाडी येथील श्री काळंबादेवी मंदिर परिसरामध्ये नुकतेच झी टाॅकीजच्या टीमने चित्रीकरण केले आहे. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिध्द अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी केले आहे. शुभम प्रोडक्शन चे दिग्दर्शक हेमंत पांचाळ यांनी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे. कीर्तनकार ह.भ.प.संगीताताई येनपुरे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केेले. विशेष म्हणजे झी टाॅकीजवर दिसणारा तळमावले हा पहिलाच कार्यक्रम आहे.

या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झी टाॅकीज या वाहिनीवर शुक्रवार दि.13 ऑक्टोबर मंगळवार दि.24 ऑक्टोबर, 2023 अखेर दररोज सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा आंनद घ्यावा असे आवाहन श्री काळंबादेवी चॅरिटेबल ट्रस्ट वरची शिबेवाडी गुढे ता.पाटण यांच्या वतीने करण्यात आले आहे