वांगव्हँली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब रोडे तर उपाध्यक्षपदी नितीन बेलागडे यांची निवड.तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
तळमावले  तालुका पाटण येथे वांगव्हँली पत्रकार संघाची वार्षिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार  दैनिक लोकमतचे बाळासाहेब रोडे यांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी तरुण भारतचे नितीन बेलागडे, सचिवपदी प्रभातचे विजय सुतार तर कार्याध्क्षपदी प्रमोद पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय लोहार यांच्या अध्यक्षतेखाली तळमावले येथे पत्रकार संघाची बैठक झाली. यावेळी पुढारीचे पत्रकार तुषार देशमुख, कृष्णाकाठ चे संपादक चंद्रकांत चव्हाण आप्पा,जेष्ठ पत्रकार पोपटराव झेंडे, पोपटराव माने, डॉ संदीप डाकवे,साप्ताहिक कुंमजाई पर्वचे संपादक प्रदिप माने,अमोल चव्हाण, सुरेश पाटील, राजेंद्र पुजारी उपस्थित होते.
गेल्या चार वर्षाच्या कालावधीत वांग व्हँली पत्रकार संघाने विविध उपक्रम राबवून समाजोपयोगी घटकांना प्राधान्य दिले असून यापुढेही संघाची अशाच पध्तीने वाटचाल सुरु राहिल.असे संजय लोहार यांनी सांगितले.
तुषार देशमुख यांनी स्वागत केले तर पोपटराव झेंडे यांनी आभार मानले.