जयहिंद गणेश मंडळाने जोपासली सर्वधर्मसमभाव परंपरा


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुंभारगांव तालुका पाटण येथील "जयहिंद गणेश मंडळ कुंभारगांव यांनी समाजात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या वेळी मंडळाच्या हिंदू, मुस्लिम युवकांनी एकत्र येत गणरायाची आरती केली. 

 गणेश उत्सव साजरा करत असताना सणाचे पावित्र्य राखून सामाजिक एकोपा राहावा या भावनेने प्रेरित होऊन कुंभारगांव ता पाटण येथील जयहिंद गणेश मंडळातील सर्व हिंदू -मुस्लिम कार्यकर्त्यांनी एकत्र येत गणरायाची आरती करून समाजासाठी सर्व धर्म समभावाची परंपरा जोपासत हिंदू - मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला या उपक्रमाचे सर्व परिसरातून कौतुक होत आहे.