कुंभारगांव पशूवैद्यकीय दवाखान्या कडून पाळीव जनावरांना लसीकरण.


कुंभारगांव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुंभारगांव ता पाटण येथील पशुवैद्यकीय दवाखाना यांचे वतीने 'लंपीच्या पार्श्वभूमीवर  शिवसमर्थ गो शाळा वायचळवाडी (कुंभारगांव )मधील 35 खिलार जनावरांना वांझ तपासणी, औषधोपचार, लंपी लसीकरण करण्यात आले या करीता डॉ .ऋषिकेश व्हनाळे ढेबेवाडी, डॉ बाबासाहेब शेडगे कुंभारगांव, डॉ बबन पाटील तळमावले, डॉ. आत्माराम गायकवाड उमरकांचन, डॉ निलेश टोणपे सनबूर तसेच बबलू चव्हाण यांनी सहभाग घेत शिबीर पार पाडले.
यावेळी शिवसमर्थ मल्टीस्टेट को -ऑप.क्रे. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष्य ॲड. जनार्दन बोत्रे, प्रा. सुनील ढेंबरे, वायचळ सर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर यांचे हस्ते पशुवैद्यकीय डॉक्टरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.   ______________________________
आपल्या विभागात लंपी आजाराची बाधा झालेली नाही तरी जनावरांना ताप येणे, चारा खाण्याचे प्रमाण कमी येणे अशी लक्षणे दिसून आल्यास शेतकऱ्यांनी नजीकच्या पशुवैधकीय दवाखान्याशी संपर्क करावा.
 डॉ बाबासाहेब शेडगे.
_______________________________