ग्रामीण आधार प्रतिष्ठाण बामणवाडी यांच्या वतीने विर्ध्यांसाठी सुसज्ज ग्रंथालयाची सोय.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
बामणवाडी (लक्ष्मी नगर) तारुख येथे ग्रामीण आधार प्रतिष्ठाण बामणवाडी च्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम राबविला जात आहे. श्री लक्ष्मी देवी हायस्कूल बामणवाडी येथे सर्व वाडी वस्त्यातील शालेय विर्ध्यांसाठी सुसज्ज ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी परिसरातील सर्व ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक राजेश साळुंखे, आदर्श शिक्षक कृष्णा देसाई गुरुजी व वि. दा. कुराडे गुरुजी यांच्या शुभ हस्ते फीत कापुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी आधार चे अध्यक्ष शिवाजी मोरे, श्रीरंग कुराडे, सर्जेराव देसाई , निवृत्ती शिबे, शिवाजी काटेकर, गिरजा अप्पा देसाई, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल चव्हाण, मुख्याध्यापक शेवाळे सर , शरद पवार, तानाजी पवार, दादा तोडकर , सरपंच बामणवाडी सौ. देसाई, उपसरपंच सौ. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी गावातील सर्व महिलांनी सरस्वती पुजन करुन हळदी कुंकू पुजा करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे आयोजन आधार प्रतिष्ठाण चे भारतीय सैन्यदलातील इंजिनीअर्स विभागातील कार्य सेवा बजावत असनारे कर्नल महादेव लक्ष्मण काटेकर यांनी विवध मान्यवरांना सोबत घेत कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.ग्रामीण भागातील तरुण पिढी साठी सुसज्ज ग्रंथालय हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बनलं आहे. यामध्ये तलाठी, पोलिस, आर्मी, नेव्ही, अग्नीवीर एअरफोर्स, CRPF , CSSF , BRO , GREEF, MPSC, UPSC या सारख्या विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध असणार आहेत.

आधार प्रतिष्ठाणच्या माध्यमातून ग्रंथालय कार्यसिद्धीचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.