कोकरूड | नारायण घोडे पाटील: शिराळा तालुक्यातील सागाव येथे जिल्हा परिषद शाळा सागाव नंबर 1 व 2 च्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन महाफीडचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रवीण पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
महाफीड फाउंडेशन पुणे यांनी तीन लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषद शाळा सागाव नंबर 1 व 2 साठी प्रवेशद्वार उभारले. प्रवेशद्वार उद्घाटना बरोबर महाफीड फाउंडेशन यांच्या वतीने शाळेतील मुलांना पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आला.
याच दिवशी जयसिंग महादेव पाटील, निवृत्त शाखा अभियंता पाटबंधारे विभाग यांनी शाळेसाठी प्रयोगशाळा साहित्य दिले त्याचेही उद्घाटन गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याचबरोबर मधुकर, सदाशिव व राजाराम आबा शिद यांच्या वतीने शाळेसाठी संगणक देण्यात आला. त्याचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी महाफीडचे प्रल्हाद साळुंखे, तानाजी पवार, नितीन पवार, धनसिंग राजपूत, सचिन देशमुख, श्रीधर गुरव, समर्थ मते, शिक्षण विस्तार अधिकारी संजय पाटील, जगन्नाथ नाकील, धोंडीराम गोसावी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल पाटील व विनोद दिवे, सरपंच अस्मिता पाटील, उपसरपंच वंदना पाटील, मुख्याध्यापक सुजाता शेटे व मीना चव्हाण उपशिक्षक श्रीरंग गायकवाड, कृष्णा शीद, संभाजी खोत, वासंती पाटील, निलक्षी पाटील, प्रतिभा जाधव व नीलम पवार उपस्थित होते.