कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
अजित पवार यांनी सत्तेत पाऊल ठेवताच राष्ट्रवादी आणि काँग्रच्या नेत्यांकडून त्यांच्यावर सडकून टिका होत आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवार यांना चांगलेच धारेवर धरण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील आता अनेक दावे केलेले आहेत. अजित पवार यांची एंट्री झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला धोका निर्माण झाल्याची चर्चा आधीपासूनच राजकीय वर्तुळात रंगत होती. त्यात आता पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील उडी घेतली आहे. .

या वेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक दावे केले आहेत.
अजित पवार सत्तेत आल्याने भाजपसाठी एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता संपलेली आहे, असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आणखी एक मोठा दावा केलेला आहे तो म्हणजे नितीन गडकरी आणि संघाचा अजित पवारांच्या सरकारमधील विरोध असल्याचे पृथ्वीराज चव्हण म्हणाले.
राष्ट्रवादिला संपवण्यासाठी सोनिया गांधींनी मला महाराष्ट्रात पाठवलं हा पवारांचा गैरसमज असल्याचेही चव्हाण यावेळी म्हणाले. आघाडीच्या काळात मी मुख्यमंत्री झाल्यापासून शरद पवारांना माझ्याबद्दल गैरसमज आहे असे देखील ते म्हणाले. यासोबतच अजित पवारांना भाजप मुख्यमंत्री करणार असा दावा पृथ्वीराज चव्हाण यानी केला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सर्व सांगितले आहे.