साईकृपा ग्राफिक्सचा वर्धापन दिन वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून साजरा.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
तळमावले ता पाटण येथील साईकृपा ग्राफिक्स चा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. वर्धापन दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत साईकृपा ग्राफिक्सच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच साईकृपा ग्राफिक्सचे अक्षय सावंत व संदेश सावंत या बंधूनी आपण ज्या शाळेत शिकलो संस्काराचे धडे घेतले त्याच संस्कारातून आपल्या श्री वाल्मिकी विघामंदिर तळमावले ता पाटण येथील वांग व्हँली वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना खाऊ वाटप करून वर्धापन दिन साजरा केला.

या वेळी श्री सत्यनारायण पुजा आयोजित करण्यात आली होती. या साठी तळमावले बाजारपेठेतील मान्यवर तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार, कृषी व विविध क्षेत्रातील मान्यवर व गणेश मंडळाचे पदाधिकारी इ. मंडळीनी उपस्थित राहून शुभेछा दिल्या.

यावेळी श्री सुनिल सावंत, पै गणेश चव्हाण, रोहित काळे , ओंकार मोहिते, आकाश ताईगडे, प्रा सचिन पुजारी सर , प्रविण सुतार सर व वसतिगृहातील विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सचिन पुजारी सरांनी केले व आभार मा प्रविण सुतार सरांनी मानले.

वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहून शुभेच्छा दिल्याबद्दल साईकृपा ग्राफिक्सचे अक्षय सावंत व संदेश सावंत यांनी मान्यवरांच्या आभार मानले.