प्रज्ञा पाटील हिचे मंथन परीक्षेत सुयश


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
मंथन वेलफेअर फौंडेशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रज्ञा पांडूरंग पाटील हिने पाटण केंद्रांत प्रथम क्रमांक मिळवला असून शिष्यवृत्ती प्राप्त केलेली आहे,याबद्दल तिचा नुकताच शाल,श्रीफळ,प्रमाणपत्र,स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देवून नुकताच मंथन परिवारातर्फे सत्कार करण्यात आला आहे, प्रज्ञा हिचे वडील पांडूरंग पाटील हे दौलत औदयोगिक प्रशिक्षण संस्था मरळी येथे ड्रा़ईग शिक्षक म्हणून कार्यरत असून तिने यापूर्वी अनेक स्पर्धा स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेले आहे,तसेच तिने पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.५वी मध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत क्रमांक पटकविलेला होता,या तिच्या यशाबद्दल येरफळे गावचे सरपंच,सर्व सदस्य तसेच अशोक पाटील, पांडूरंग चव्हाण,बंडू कदम (गुरूजी),सुरेश जाधव ,शिवाजी सांळुखे,सुनिल पडवळ, प्रकाश पडवळ,अनिल भिसे,शंकर भिसे,संतोष कदम(सर)यांनी तिचे अभिनंदन केले आहे