अजित पवार यांचं थेट शरद पवार यांना आव्हान ! पक्ष आणि चिन्हाबद्दल अजित पवार यांचं महत्वाच विधान.


मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परत एकदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राजाच्या राजकारणात मोठा भूकंप केला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अजित पवारांनी पक्षावर दावा सांगत थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार? 
विरोधी पक्षांची बैठक होते त्यामध्ये आऊटपूट काही निघत नाही. भारत देशाची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. याचा विचार करता आम्ही सगळ्यांनी तशाप्रकारचा निर्णय घेतलं. आज शिंदे-फडणवीस सरकारचं काम करत आहे. मी इतके दिवस विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. पण शुक्रवारी मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. मागे देखील आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी माझी भूमिका स्पष्ट केल्याचं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गेले 24 वर्षांपासून छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल किंवा सगळ्यांनीच शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. आगामी काळात तरुणांना संधी देण्याची जास्त आवश्यकता आहे. त्या संदर्भात वेगवेगळे विझन आहे. त्या विझनमध्ये नवे कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजेत. त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.

पक्ष आणि चिन्हाबद्दल अजित पवार यांचं महत्वाच विधान
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज मोठी घडामोड घडली आहे. पक्षात उभी फूट पडली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाले आहेत.

राजकीय पक्ष आणि चिन्ह माझ्याकडे आहे असं अजित पवार म्हणाले. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपासोबतही जाऊ शकतो. बहुतांश आमदार, नेत्यांना आमचा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत असं अजित पवार म्हणाले.