काळगाव येथील अष्टविनायक पतसंस्था मध्यरात्री चोरट्यांनी फोडली,रोख रक्कम लंपास.

रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची जनतेची मागणी.तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:   
भरेवाडी काळगाव ता. पाटण येथे अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था फोडून चोरट्यानी 64 हजार 345 रुपये रोख रक्कम लंपास केली. आज सकाळी सीसीटीव्ही, श्वान पथक तसेच फिंगर तज्ञ यांच्या साह्याने तपासणी केली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू असल्याचे स.पो. नी. अभिजित चौधरी यांनी सांगीतले.

        याबाबत अष्टविनायकचे व्यवस्थापक दत्तात्रय दिनकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दिलेली माहीत अशी अष्टविनायक पतसंस्था पाचपुते यांच्या इमारतीत आहे. याचे मालक रामचंद्र पाचुपते यांच्या निदर्शनास आले त्यांनी संस्थेचे कर्मचारी रामचंद्र बावडेकर, यांना बोलावून घेतले.यावेळी संस्थेचे शटर कोणीतरी उचलल्याचे दिसून आले. यानंतर माजी चेअरमन गोविंदराव गोटुगडे, व्हाईस चेअरमन दिनकर पाचुते पोलीस पाटील नितीन पाटील हे घटनास्थळी आले यावेळी हा चोरीचा प्रकार असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला असून चोरट्याने रोख रक्कम लंपास केली. दरम्यान सीसीटीव्ही मध्ये दोन चोरटे दुचाकीवरून आलेले दिसत असून त्यांनी त्यांचा चेहरा बांधल्यामुळे ओळखुन येतं नाही.त्यांनी संस्थेच्या जवळ असणारे दोन सीसीटीव्ही फोडलेले आहेत. प्रथमता त्यानी अष्टविनायक पतसंस्थेच्या पुढे गाडी लावलेली दिसत असून नंतर पाठीमागे आणून तळमावलेच्या दिशेने लावली असल्याचे दिसत आहे. अष्टविनायक मधील रक्कम घेऊन नंतर त्यांनी कराडच्या दिशेने पोबारा केला असावा. असा अंदाज केला जात आहे. तळमावले येथे सीसीटीव्ही मध्येही चोरटे दुचाकीवरून दिसत आहेत. घटनास्थळी पोलीसांनी श्वान पथक आणले होते ते अष्टविनायक पासून चोरट्यांनी लावलेल्या गाडी पर्यंत गेले आणि थांबले.

       याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नी. अभिजित चौधरी यांच्यासाबोत पी. एस आय.तलबार, पोलीस हवालदार संजय राक्षे पोलिस हावलदार शेळके, नवनाथ कुंभार, अधिक तपास करीत आहेत.

_______________________________________

अष्टविनायक पतसंस्था गेली पंधरा वर्षे या विभागात चालू असून सर्वसामान्य माणसांचा ही संस्था मोठी आधार आहे. या संस्थेच्या मुख्य भरेवाडी येथील शाखेत चोरी झाली ही घटना बरोबर नसून चोरट्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे.

- चेअरमन एम.बी. आचरे

_______________________________________