जननी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आ. च.विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
जननी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मलकापूर येथील आ. च. विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप जननी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप फुके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे सचिव मा.शेतिमित्र अशोकराव थोरात म्हणाले ट्रस्टच्यावतीने गरजू होतकरू विद्यार्थ्यांना दिली जाणारी मदत अत्यंत प्रेरणा देणारी असून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा ट्रस्टचा उपक्रम समाजासाठी आदर्शवत आहे. 

       याप्रसंगी श्री शेखर शिर्के यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ अरुणा कुंभार यांनी केले. उपमुख्याध्यापक श्री ए.बी.थोरात यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

       कार्यक्रमास बाळकृष्ण मतकर, विशांत थोरात, सौ आर आर जाधव पर्यवेक्षक बी.जी बुरुंगले यांची उपस्थिती होती.