पाटण तालुक्यात लवकरच कृषी महाविद्यालय उभारणार : मंत्री शंभूराज देसाई.


पाटण| कृष्णाकाठ वृत्तसेवा :
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रगती साठी पाटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागातील विध्यार्थी यांच्या प्रगतीसाठी स्वर्गीय आबासाहेब यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारां च्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आपण सदैव प्रयतशील आहे.दरम्यान पाटण तालुक्यातील शैक्षणिक विकासासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व. शिवाजीराव देसाई यांनी आपले आयुष्य वेचले मात्र तालुक्यातील काही लोकांनी कारस्थान करून कोयना शिक्षण संस्थेतुन देसाई परिवाराला जाणीवपूर्वक बाजूला केले मात्र तरीही तालुक्यात विविध प्रकारची शिक्षणाची दालने उभी करून देसाई परिवाराने सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आता तालुक्यात लवकरच कृषी महाविद्यालय उभारणार असल्याची ग्वाही राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केली.

                   लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या ३७ वा पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, देसाई कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, डॉ.दिलीपराव चव्हाण, पाटण बाजार समितीचे चेअरमन बाळासाहेब पाटील, विलास गोडांबे, अशोकराव पाटील, बशीर खोंदू, ॲङ डी.पी.जाधव, विजय पवार, विजय शिंदे, संतोष गिरी, पंजाबराव देसाई, सुरेश पानस्कर, भरत साळूंखे, शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख, अभिजित पाटील, बबनराव शिंदे, माणिक पवार, राजेंद्र चव्हाण, नामदेवराव साळूंखे, जालिंदर पाटील, सोमनाथ खामकर,बबनराव भिसे, शशिकांत निकम, विजय जंबुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

         ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले, सहकार क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत काम कसे करायचे याची शिकवण खऱ्या अर्थाने स्वर्गीय आबासाहेब यांनी दिली. कारखान्याची उभारणी करताना लोकनेते सत्तेमधून बाहेर गेले तरी ही खडतर परिस्थिती मध्ये त्यांनी कारखाना चालवला आणि अल्पावधीमध्येच हा कारखाना कर्जमुक्त करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मालकीचा करून दिला. स्पर्धेचे युग आहे. आपण स्वतः शी स्पर्धा केली पाहिजे. ग्रामीण भागात मुल मुली अव्वल कामगिरी करत आहेत. स्पर्धा वाढली आहे. ग्रामीण भागातील मुलांना विनंती आहे, मुलांनी पालकांकडे मागणी करताना आपण ही आपल्या पालकांचे नाव उज्वल करावं ही जिद्द मनी बाळगली पाहिजे. तालुक्यातील मुलं मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका काढली आहे. शहरातील मुलं स्पर्धा परिक्षेत यश मिळवत आहेत आपल्या ही तालुक्यातील मुलं अशी घडली पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस युवा पिढीला मंत्री देसाई यांनी शुभेच्छा व्यक्त करून ते म्हणाले, आपल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी कृषी सारखे महाविद्यालय निर्माण व्हावे अशी ग्रामीण भागातून मागणी असलेने लवकरच आपण पाटण मतदार संघात कृषी महाविद्यालय उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा करून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा एक काळ सुवर्णकाळ होता आणि लोकनेत्यांच्या तोच दरारा आणि सुवर्णकाळ पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. तसेच पाटण मतदारसंघ हा विकासकामांत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात एक रोल मॉडेल होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. स्व आबासाहेब यांची कर्मभूमी, जन्मभूमीत आपण आहोत. त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव उज्वल करण्याचे काम आपण केले पाहिजे.असे आवाहन ही त्यांनी शेवटी केले. दरम्यान मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते पाटण तालुक्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक केंद्रात प्रथम, व्दितीय, तृतीय व विविध स्पर्धा त उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक पांडुरंग नलवडे यांनी केले. आभार बबनराव शिंदे यांनी मानले.

कोयना शिक्षण संस्थेत कारस्थान केले..!

लोकनेते बाळासाहेब देसाई, के.व्ही.बापू पाटील, भागवतराव देसाई यांनी कोयना शिक्षण संस्था उभारली आणि काही लोकांनी त्यांना या संस्थेतून बाहेर काढले. काही लोकांनी स्वतः च्या ताब्यात कोयना शिक्षण संस्था घेतली. राजकारण करुन संस्था ताब्यात घेतली. म्हणून मोरणा शिक्षण संस्था काढली. राजकारण कटकारस्थान करुन कोयना संस्था ताब्यात घेतली. म्हणून आम्ही जिद्दीने मोरणा शिक्षण संस्था काढून तालुक्यात शिक्षणाची दारे उघडून दिली. असा टोला मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी लगावला.