अनिल कचरे यांचा शौर्य पुरस्काराने सन्मान



कोल्हापूर : शिवज्ञा महिला बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने अनिल कचरे यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करताना पदाधिकारी.
कोल्हापूर|कृष्णाकाठ वृत्तसेवा: कोल्हापूर येथील शिवज्ञा महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने येथील अनिल कचरे यांना सामाजिक कार्याबद्दल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथील बालकल्याणकारी स्वयंसेवी संस्थेतील माहेरवाशिनी सांस्कृतिक बाल शौर्य पुरस्कार सोहळ्यात सन्मानचिन्ह देऊन गौरव झाला. (कै.) दत्तात्रय कचरे स्मारक समितीच्या वतीने संस्थेतील अनाथ मुलांना जेवणाचे डबे वाटप करण्यात आले होते. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा व रिमांड होम अधीक्षिका शुंभागी पाटील, पोलिस निरीक्षक श्रीमती नारायणकर, चित्रपट अभिनेते गणेश शिंदे, अभिनेत्री सारिका जाधव, ग्रामपंचायत सदस्या विजया कचरे व कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित होते.