कराडमध्ये विमानतळाचा विस्तार करण्याची योजना ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
राज्याच्या मध्यवर्ती भागात मोठ्या एअरपोर्टची गरज असून कराड शहरात जमीन संपादन करण्यासाठी पुन्हा जोमाने प्रक्रिया राबवि ण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली आहे. नवीमुंबईचा विमानतळ पुढच्या वर्षी सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील अन्य ठिकाणी विमानतळ सुरु करण्याच्या योजनांची देखील त्यांनी यावेळी माहीती दिली.

कराडला मोठा एअरपोर्ट का गरजेचा ?

काही वर्षांपूर्वी कोल्हापूरला मोठा पूर आला होता. त्यावेळी पुरामुळे कोल्हापूरचा एअरपोर्ट वापरता येत नव्हता. त्यामुळे कराड सारख्या मध्यवर्ती भागात मोठ्या विमानतळाची गरज निर्माण झाली. परंतू तेथील लोक जमिन देण्यास विरोध करीत आहेत. हा प्रश्न लवकरच सोडविण्यात येणार असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी सांगितले.