आ.च. विद्यालय,मलकापूर येथील गुणवंत व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.


मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे, आ.च. विद्यालय,मलकापूर येथे शैक्षणिक वर्ष 2022- 23 मधील गुणवंत व स्पर्धा परीक्षांमध्ये उज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

      कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री.भूपेश सिन्हा (प्रमोटर्स अँड बिल्डर्स) हे लाभले होते. ते आपल्या भाषणांमधून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन पुढे ते म्हणाले ,जीवनातील हे यश शिखर असेच उंचावत जावू दे, आशीर्वाद दिला.

       प्रमुख पाहुणे भरोसा सेल, कराडच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमती हसीना मुजावर यांचेही गुणवंत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. सत्कार समारंभांमध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये मा.श्री.अशोकराव थोरात (भाऊ,शेती मित्र) हे उपस्थित होते. ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, शिक्षणाचे अनेक टप्पे आपले जीवनात येतात. त्यातील पहिला टप्पा आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. असेच येणारे टप्पे त्यात आपण यश शिखर गाठावे, अशा शुभेच्छा दिल्या.

       सत्कार समारंभ प्रसंगी सन 2022 -23 मध्ये एस.एस.सी बोर्ड परीक्षेत यश मिळवलेल्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार घेण्यात आला. त्यामध्ये 1)आशिष दीपक गावडे 1)विवेक दिलीप शिर्के2) सुयश कृष्णा काकडे 3)श्रीदत्त नानासाहेब पाटील 4)ओंकार धनाजी कोळी 5)सोहम सागर बोंद्रे 5)सुजल प्रकाश पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.   

         तसेच इयत्ता पाचवी ते दहावी मधील विविध स्पर्धा परीक्षां, शिष्यवृत्ती परीक्षा,एन .एम. एम. एस. परीक्षा, श्री मळाई देवी शिष्यवृत्ती, सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

          सत्कार समारंभात श्री. अशोकराव थोरात यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. समारंभास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. भास्करराव मोहिते, श्री. जयवंतराव कराळे, सौ. परवीन बागवान, श्री. मधुकर जाधव, श्री. शेखर शिर्के, श्री. अनिल शिर्के, श्री.सावंता गाडे, सौ. नीलम महाडिक, श्री. तुळशीराम शिर्के (खजिनदार ), पथक पर्यवेक्षण प्रमुख श्री.आर.ए. कुंभार तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. पी.जी. पाटील, उपाध्यक्ष बी.बी. पाटील व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित, मान्यवर पालक उपस्थित होते, त्याचबरोबर मुख्याध्यापिका सौ.ए.एस. कुंभार, उप मुख्याध्यापक श्री. ए.बी.थोरात, पर्यवेक्षक श्री. बी.जी. बुरुंगले,सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.शरद तांबवेकर व सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अरुणा कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन सविता पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार उप मुख्याध्यापक ए बी थोरात यांनी मानले.