फलटण गावचे सुपुत्र व सध्या तळमावले सब स्टेशनच्या कुंभारगाव तालुका पाटण येथील राज्य विधुत वितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ दिलीप शिवाजी घोलप यांचा सेवा गौरव सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सोमवार 31 जूलै रोजी दिलीप घोलप म्हणजेच सर्व परिचित असणारे नाना सेवानिवृत्त होत असून त्या निमित्त महाराष्ट्र राज्य विधुत मंडळाचे तळमावले सेक्शन ऑफिस येथे त्यांचा सेवा निवृत्ती गौरव समारंभ आयोजित केला आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कराडचे उप कार्यकारी अधिकारी अभियंता अमित आदमाने, तर आयोजित कार्यक्रमाच्याअध्यक्ष स्थानी मल्हारपेठचे उपकार्यकारी अधिकारी अभियंता चेतन कुंभार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या समारंभासाठी मान्यवर पदाधिकारी सा.अभियंता तळमावले धनंजय शेंडे, सा.अभियंता ढेबेवाडी विशाल मोहिते, कनिष्ठ अभियंता मल्हारपेठ सागर यादव, सा. अभियंता अमोल देसाई उपस्थित राहणार आहेत. तसेच तळमावले, ढेबेवाडी, कोळेवाडी सेक्शनचे पदाधिकारी कर्मचारी ही उपस्थित राहणार आहेत.
तसेच दुपारी 2 वाजता कुंभारगांव ग्रामपंचायतीच्या वतीने सांस्कृतिक भवन येथे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांचे वतीने दिलीप घोलप यांचा सेवा निवृत्ती सेवा गौरव समारंभाचेही आयोजन करण्यात आले आहे.
ज्या कुंभारगांव मध्ये गेली 28 वर्षे अविरत सेवा केली त्या बद्दल आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने ते 1 ऑगष्ट 2023 रोजी कुंभारगांव ग्राम दैवत श्री लक्ष्मी अंबाबाई देवीच्या पौर्णिमेच्या भंडाऱ्यासाठी अन्न दान करणार आहेत.तसेच दुपारी 3 वाजता कुंभारगांव परिसरातील वीज ग्राहक, ग्रामस्थ, यांना दिलीप घोलप यांचा 28 वर्ष केलेल्या सेवे बाबत आभार मान्यासाठी श्री लक्ष्मी अंबाबाई देवीच्या मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यावेळी तळमावलेचे सहाय्यक अभियंता यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवानराव पाटील, बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन, विद्यमान संचालक डॉ दिलीपराव चव्हाण, सातारा जि.प. माजी अर्थ, शिक्षण, क्रिडा सभापती संजय देसाई, कुंभारगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सारिका पाटणकर, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, सोसायटीचे चेअरमन, संचालक विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.