शिवसमर्थ परिवारच्या वतीने वायचळवाडीत सुसज्ज गोशाळा.

वृद्ध - अनाथ गोवंशांचे करणार पालन.तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
आर्थिक क्षेत्रासह विविध सामाजिक उपक्रमांतून सामाजीक बांधिलकी जपत असलेल्या शिवसमर्थ परिवाराने तळमावले जवळील वायचळवाडी कुंभारगांव या ठिकाणी गोशाळा उभी करुन एक नवीन आणि क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. नुकतेच या शिवसमर्थ गोशाळा केंद्राचे उद्घाटन झाले आहे. शिवसमर्थ परिवाराचे कुटूंबप्रमुख ॲड.जनार्दन लक्ष्मण बोत्रे साहेब यांच्या मार्गदर्शन आणि संकल्पनेतून गोशाळेचे स्वप्न साकार झाले आहे. 

 शुक्रवार दि.७ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता विधीवत पध्दतीने संस्थेचे व्यवस्थापक श्री. नितीन पाटील यांचे हस्ते होमहवन व पुजा करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसमर्थ परिवाराचे कुंटूंबप्रमुख ॲड. जनार्दन बोत्रेसाहेब, उपमहाव्यवस्थापक श्री. हेमंत तुपे, सल्लागार देवबा वायचळ, विकास शिरसट या मान्यवरांसमवेत गोशाळेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी वायचळवाडी, माटेकरवाडी, चोरगेवाडी, शिबेवाडी आणि कुंभारगांव विभागातील व शिवसमर्थ परीवारातील बहुसंख्य सदस्य तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

 गोमातेचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आपल्या मातेप्रमाणे गाईची सेवा व देखभाल प्रत्येकाने केली पाहीजे. 

गोशाळेत वृध्द, भाकड, अपंग, अपघातग्रस्त, आजारी व अनाथ गोवंशाचे पालन केले जात आहे. या गाईंसाठी अत्याधुनिक असा गोठा उभा करण्यात आला आहे. गोशाळा केंद्रात आता २१ गाई आहेत. याच्या पालन पोषणासाठी ५ कर्मचारी कार्यरत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परिसरातील ग्रामस्थ या गोशाळा केंद्रास आवर्जुन भेट देत आहेत.