वैदयकीय क्षेत्रात नावलौकिक वाढवावा : रविराज देसाई


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
अडूळ ता.पाटण या गावचे सुपुत्र व मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल.केंडे सर यांचे चिरंजीव डॉ.रोहित केंडे यांने नुकतीच एम.एस.(नेत्ररोग तज्ञ)डिग्री प्राप्त केली,त्याबद्दल डॉ.रोहित केंडे यांचा शाल,श्रीफळ, पेढे,व बुके देवून मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आला,त्यावेळी ते बोलत होते.तसेच ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुले आपले बौद्धिक क्षमता प्राप्त करून यश संपादन करतात ,ही बाब खरोखरच अभिमानास्पद आहे,असे ते यावेळी म्हणाले.

डॉ.रोहित केंडे वैदयकीय क्षेत्रांतील एम.एस.डिग्री प्राप्त केल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभुराज देसाईसाहेब, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई दादा,युवा नेते जयराज देसाई,आदित्यराज देसाई कृषी सभापती बाळासाहेब पाटील,लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव एन.एस.कुंभार, मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव श्री.डी.एम.शेजवळ,प्राचार्य गणेश सत्रे, विजयकुमार शिर्के ,धनाजी केंडे, विष्णू पवार, शिवाजीराव देसाई विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.जे.एस.मदने,श्री.के.जे.चव्हाण, काशिनाथ तिकुडवे,संतोष कदम, काशिनाथ तिकुडवे, यांनी डॉ.रोहितचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.