अपघातातील बडतर्फ एसटी चालकाला पुन्हा कामावर घेण्याचे कोर्टाचे आदेश


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
दापोली-मुंबई  मार्गावर नऊ वर्षांपूर्वी  झालेल्या एका एसटी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.या अपघातानंतर कामावरून बडतर्फ करण्यात आलेल्या  संबंधित चालक सिद्धार्थ सावंत यांना पुन्हा कामावर घेण्यात यावे,असा महत्वपूर्ण आदेश मुंबई कामगार न्यायालयाने दिला आहे.

एसटी चालक सिद्धार्थ सावंत हे २० फेब्रुवारी २०१४ रोजी दापोली-मुंबई ही बस चालवित होते. त्यावेळी ही बस पांढरापूर जवळ आली असताना एका वाहनाने एसटीला पाठीमागून धडक दिली.यात  त्या वाहनावरील एक व्यक्ति  खाली कोसळून तिचा मृत्यू झाला होता.या अपघातानंतर एसटी महामंडळाने केलेल्या चौकशीत गुन्हा सिद्ध झाला नसताना चालक सिद्धार्थ सावंत यांना कामावरून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर सिद्धार्थ सावंत यांनी कामगार न्यायालयात धाव घेतली.यावेळी अ‍ॅड.सुनील पाटील यांनी सावंत यांच्यावतीने  न्यायालयात बाजू मांडली. त्यावेळी न्यायाधीश व्ही.ओ.पाटील यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर बसचालक सिद्धार्थ सावंत यांना पुन्हा कामावर घेऊन त्यांना १२ डिसेंबर २०१४ पासून आतापर्यंतचा पगार देऊन पुन्हा कामावर घेण्यात यावे असा आदेश दिला.