लायन्स क्लब ऑफ कराड सिटीच्या वतीने मधुमेह चाचणी शिबीर व मल्टीव्हिट्यामिनच्या टॅब्लेटचे वाटप.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
लायन्स क्लब ऑफ कराड सिटीच्या वतीने माजी प्रांतपाल MJF लायन प्रभाकरजी आंबेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांची मधुमेह चाचणी शिबीर व मल्टीव्हिट्यामिनच्या टॅब्लेटचे वाटप करण्यात आले.

नगरपालिकेची शाळा नंबर 7 येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

कराडमधील संजीवनी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल येथील डॉ.विलासराव थोरात, डॉ.कोमल मांजरेकर, समृद्ध देसाई, डॉ.मनोज जगताप व त्यांची टीम यांचे मोलाचे सहकार्य झाले.क्लबचे अध्यक्ष लायन संदीप कोलते , सचिवा MJF लायन सौ मंजिरी खुस्पे , खजिनदार लायन सौ मीना कोलते , झोन चेअरमन लायन सुशांत व्हावळ , LCIF कोऑर्डिनेटर MJF लायन डॉ महेश खुस्पे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले तसेच क्लबचे लायन लक्ष्मण यादव ,ला.राजश्री खराडे ,ला. शशिकांत पाटील ,ला.उमा जानुगडे ,ला.संगीता शिंदे , ला.महिमा धांडे हे सदस्य उपस्थित होते.