संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यपदी गोविंदराव गोटुगडे यांची निवडतळमावले | कृष्णकाठ वृत्तसेवा:
सातारा जिल्हयातील पाटण तालुक्याचे संजय गांधी सामाजिक अर्थसहाय्ययोजनेनुसार वित्तीय सहाय्य मागणीसाठी आलेल्या अर्जाची छाननी करुन निर्णय घेणेसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदी गोविंदराव गोटुगडे (आप्पा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे.

गोविंदराव गोटुगडे (आप्पा) यांनी यापूर्वी काळगांव ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषवले आहे. गोटुगडे हे सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या या निवडीमुळे विभागातील महिलांना त्यांच्या पदाचा लाभ मिळेल. या निवडीबद्दल त्यांचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, गटनेते पंजाबराव देसाई, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भरत साळुंखे, अष्टविनायक पतसंस्थेचे संस्थापक सुभाषराव बावडेकर, बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, विशाल पवार, कृष्णत पाचुपते, उपसरपंच शिवाजीराव पवार, उपसरपंच वसंत देसाई व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच ग्रामपंचायत धामणी, काळगांव, कुंभारगांव गण यांच्यावतीने देखील गोविंदराव गोटुगडे यांचा सत्कार करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.