पाटणचे प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी शेताच्या बांधावर जाऊन केली ई पिक पाहणी.


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
शासन आपल्या दारी या शासनाच्या उपक्रमाच्या अनुषंगाने 10 जून रोजी भाग्यश्री मंगल कार्यालय ढेबेवाडी येथे प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी आढावा बैठक घेतली होती त्यावेळी विभागातील सर्कल अधिकारी,सर्व पोलीस पाटील, तलाठी, कोतवाल उपस्थित होते.

 कुंभारगांव येथे प्रांत अधिकारी सुनीलजी गाढे, तहसीलदार रमेश पाटील सर्कल निकम, तलाठी, पोलीस पाटील कोतवाल यांनी ई पीक पाहणी, मतदान केंद्र तपासणी, मतदान यादी दुरुस्ती, बांबू लागवड लाभार्थी निवड असा संयुक्त कार्यक्रम पार पडला.

    पाटणचे तहसीलदार रमेश पाटील, प्रांत अधिकारी सुनील गाढे यांनी पाटण विधानसभा मतदार संघामध्ये कमी मतदान झाले होते त्या कुंभारगांव मधील मतदान केंद्र क्र, 353, 354, 355 येथे भेट देऊन पाहणी केली. या मतदान केंद्रावर विधान सभा, लोकसभेला कमी मतदान झाले होते त्या मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली या नंतर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मिटिंग पार पडली यावेळी तहसीलदार रमेश पाटील बोलत होते या मतदान केंद्रामध्ये काम करणारे BLO या मतदार यादी मध्ये नवीन विवाह झालेल्या मुलींची सासर व माहेर या दोन्ही ठिकाणी नावे दिसून येत आहेत या संदर्भात अंगणवाडी सेविका नी केलेला सर्वे याची माहिती त्यांचे कडून जाणून घेत त्या संदर्भात येणाऱ्या अडचणी बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले या मतदान यादी मध्ये मयत मतदार दिसून येत असून जे मयत आहेत त्या कुटूंबाकडून किंवा नातेवाईक यांचे कडून ऑफलाईन 7 नं फॉर्म भरून त्यावर पंच यांच्या सह्या घ्या अशा आशयाच्या सूचना BLO ना करण्यात आल्या तसेच ग्रामपंचायतीने सर्व पक्षीय ग्रामसभा घेऊन सर्वा मते वाढीव दोन्ही ठिकाणी मतदान असणारी नावे यांची सर्व माहिती तहसील कार्यालयाला ग्रामपंचायतीने पाठवावी आशा सक्त सूचना शेवटी करण्यात आल्या.

   या नंतर उपस्थित मान्यवरांचे उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच राजेंद्र चव्हाण, ग्रामसेवक अनिल जाधव, पोलीस पाटील संघटना अध्यक्ष नितीन पाटील, कुंभारगाव चे पोलीस पाटील अमोल गायकवाड, पोलीस पाटील अमित शिंदे, प्रवीण मोरे, महादेव वरेकर, विक्रम वरेकर तसेच सेवा निवृत्त अधिकारी रवींद्र सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती .