बनपुरी येथे बिबट्याचा शेळीवर हल्ला.

 


सणबुर | प्रमोद पाटील : बनपुरी ता पाटण येथील मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा शेळीवर हल्ला करून गाभण शेळी ठार केली आहे त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्याचा मानवी वस्तीमध्ये वाढणारा वावर हा नागरिकांच्या जीवाला धोका असून त्याचा बंदोबस्त करावा अशी लोकांची मागणी बनपुरी परिसरातून जोर धरू लागली आहे.
मिळालेले माहितीनुसार बनपुरी येथील श्री विजय एकनाथ पाटील यांच्या जनावरांच्या शेडा मध्ये शुक्रवारी रात्री बिबट्याने हल्ला करून त्यांची गाभण असणारी शेळी ठार केली आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाला वारोवार सांगून सुद्धा याकडे कानाडोळा केला जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे बिबट्यांचे मानवी वस्तीत वाढणारे हल्ले हे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारे आहे यासाठी वन विभागाने सापळा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.