कोकण विभागीय अधिस्विकृती समितीवर खेड चे ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांची निवड

 


कोकरूड | नारायण घोडे पाटील 
राज्य सरकारच्या पञकारासाठी असलेल्या राज्य अधिस्वीकृतीच्या कोकण विभागीय समितीवर सदस्य म्हणून खेड चे दैनिक रत्नागिरी टाइम्स चे पत्रकार दिलीप सखाराम देवळेकर याची निवड झाली आहे.

कोकण विभागीय अधीस्विकृती समितीवर असेलल्या पाच सदस्यांपैकी खेड तालुक्यातील पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये दैनिक रत्नागिरी टाइम्सचे अभ्यासू , महाराष्ट्रातून अनेक उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त व ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांची या समितीवर नियुक्ती महाराष्ट्र सरकारने केली आहे.  दिलीप देवळेकर हे एक अभ्यासू व उच्च शिक्षित पत्रकार म्हणून परिचयाचे आहेत त्यांच्या निवडीमुळे खेड तालुका रत्नागिरी जिल्ह्यातून व कोकणातून अभिनंदन होत आहे.