सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाऊस व पाणीसाठा


सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा: जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 57.45 अब्ज घन फूट पाणी साठा असून धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 38.59 टक्के इतका असल्याचे उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे.  

 जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे. मोठे प्रकल्प – कोयना – 35.62 (35.38 %), धोम – 4.57 (39.09), धोम – बलकवडी – 3.07 (77.53), कण्हेर – 3.29 (34.31), उरमोडी – 4.04 (41.87), तारळी – 4.02 (38.77). 

 मध्यम प्रकल्प – येरळवाडी – 0.0038 (0.55), नेर – 0.084 (20.19), राणंद – 0.017 (7.48), आंधळी – 0.021 (8.02), नागेवाडी – 0.056 (26.67), मोरणा – 0.878 (67.54), उत्तरमांड – 0.28 (32.56), महू – 0.793 (72.75), हातगेघर – 0.0606 (24.24), वांग (मराठवाडी) – 0.647 (23.77) या प्रमाणे पाणीसाठा आहे. 

 कोयना धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 84 मि.मी. पावसाची नोंद झाली असून मोरणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात 47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच धोम – 4 मि.मी., धोम – बलकवडी – 20, कण्हेर – 13, उरमोडी – 15, तारळी – 20, येरळवाडी – 5, उत्तरमांड – 12, महू – 15, हातगेघर – 15, वांग (मराठवाडी) – 13 मि.मी पाऊस झाला आहे. तर नेर, राणंद, आंधळी धरणाच्या क्षेत्रातील कालचा पाऊस निरंक आहे.