लायन क्लब कराड सिटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

लायन्स क्लब कराड सिटीच्या अध्यक्षपदी संदीप कोलते तर सचिवपदी मंजिरी खुस्पेकराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
लायन्स क्लब कराड सिटीचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात हॉटेल पंकज येथे संपन्न झाला. लायन्स क्लब कराड सिटी च्या नूतन अध्यक्षपदी लायन संदीप कोलते, सचिव पदी एमजेएफ लायन सौ . मंजिरी खुस्पे व खजिनदार पदी लायन सौ. मीना कोलते यांनी यावर्षीचा पदभार स्वीकारला. तसेच संचालक मंडळाचा ही पदग्रहण व शपथविधी सोहळा पार पडला . यावर्षी क्लब मध्ये जवळ जवळ ८ सदस्यांची वाढ त्यांनी केली. या कार्यक्रमास पदप्रधान अधिकारी पीएमजेएफ लायन जगदीश पुरोहित यांनी शपथविधी देऊन पदग्रहण प्रदान केला . तसेच द्वितीय उपप्रांतपाल एमजेएएफ लायन वीरेंद्रजी चिखले यांनी क्लब मध्ये आलेल्या नवीन ८ सदस्यांना शपथविधी प्रदान केला . या समारंभाला प्रांताचे प्रथम उपप्रांतपाल एमजेएफ लायन एम. के. पाटील सर तसेच रीजन चेअरमन एमजेएफ लायन बाळासाहेब शिरकांडे , एल सी आय एफ कॉर्डिनेटर लायन डॉ. महेश खुस्पे , झोन चेअरमन लायन सुशांत व्हावळ , माजी प्रांतपाल प्रभाकर आंबेकर व रीजन मधील सर्व पदाधिकारी व लायन्स क्लब कराड सिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. मागील वर्षीच्या अध्यक्षा लायन सोफिया कागदी, सेक्रेटरी लायन शर्मिष्ठा गरुड , खजिनदार लायन सुनीता पाटील यांनी नवीन अध्यक्ष , सेक्रेटरी व खजिनदार यांच्याकडे नवीन वर्षाची सूत्रे सुपूर्द केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन मैथिली खुस्पे व एमजेएफ लायन निईम कागदी यांनी केले.