श्री हनुमान तरूण मंडळ व हनुमान क्रिकेट क्लब ची सामाजिक बांधीलकी ; विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
खळे ता. पाटण येथील श्री हनुमान तरूण मंडळ व हनुमान क्रिकेट क्लब शिद्रूकवाडी यांचेकडून सामाजिक बांधीलकी जोपासण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिद्रूकवाडी (खळे) येथे शालेय साहित्य चे वाटप करण्यात आले. 

आपल्या विभागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना व अभ्यासाचा सराव करताना शालेय उपयोगी साहित्य कमी पडू नये. अनेक पालकांना सर्व साहित्य घेणे शक्य नसते हि गरज ओळखून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. 

गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य मिळावे, या दृष्टीकोनातून श्री हनुमान तरूण मंडळ व हनुमान क्रिकेट क्लब शिद्रूकवाडी (खळे) यांचे कडून मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक , मॅडम आणि हनुमान तरूण मंडळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.