पुणे विभागीय अधिस्विकृती समिती सदस्यपदी गोरख तावरे यांची निवड.


कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा 
राज्य शासनाच्या अधिस्विकृती समितीच्या पुणे विभागीय सदस्यपदी कराड येथील दैनिक सामनाचे प्रतिनिधी व साप्ताहिक राजसत्यचे संपादक गोरख तावरे यांची निवड करण्यात आली आहे. सदरची निवड ही तीन वर्षासाठी आहे.

११ जुलै रोजी राज्य अधिस्विकृती समिती व अधिस्वीकृती समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य अधिस्विकृती समितीवरील २७ सदस्य तसेच ९ विभागीय अधिस्विकृती समित्यांवरील ४५ सदस्यांच्या नेमणुकी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पुणे विभागातील समितीमध्ये कराडचे दैनिक सामनाचे प्रतिनिधी व साप्ताहिक राजसत्यचे संपादक गोरख तावरे यांच्या नावाचा समावेश आहे. पुणे, सातारा, सोलापूर जिल्हासाठी म्हणजे पुणे विभागीय समितीच्या सदस्यपदी गोरख तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कराडहून गेल्या ३५ वर्षांपासून गोरख तावरे हे दैनिक सामनासाठी प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. तसेच सकारात्मक पत्रकारितेसाठी गोरख तावरे नेहमी आग्रही असून ते पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. तसेच साप्ताहिक राजसत्य हे सुमारे २७ वर्षापासून कराडमधून प्रसिद्ध होत आहे. महाराष्ट्र संपादक परिषदेमध्ये कार्यकारणी सदस्य म्हणून गोरख तावरे काम करीत आहेत.

गोरख तावरे यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे (मुंबई), प्रकाश कुलथे (श्रीरामपूर), अनंत उर्फ राजू पाध्ये (मुंबई), गजानन कदम (मुंबई), एकनाथ बिरवटकर (मुंबई). एस. के. जाधव (मुंबई), राजेंद्र मोहिते (तळबीड/मुंबई), सातारा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण, असोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील (सांगली), राष्ट्रीय सचिव प्रवीण पाटील (वारणानगर), प्रदेशाध्यक्ष प्रदीप कुलकर्णी (बिड), सुमित कुलकर्णी (श्रीरामपूर), चंद्रशेखर गायकवाड (सोलापूर), रंगराव शिपूकडे (सांगली), हरि येवले (नाशिक), सम्राट सलगर (कागल), नेताजी मिश्राम (चंद्रपूर), मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे, सुजित आंबेकर (सातारा), रवींद्र बेडकीहाळ (फलटण), कराडचे प्रा. अशोक चव्हाण सचिन देशमुख, हेमंत पवार, देवदास मुळे, खंडू इंगळे, संतोष शिंदे, इलाई मुल्ला, प्रमोद सुकरे यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक संपादक, ज्येष्ठ पत्रकार व पत्रकारांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले आहे.