मलकापूर जिमखाना असोसिएशनच्यावतीने प्लास्टिक कचरा निर्मूलन मोहिम शुभारंभ संपन्न .


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मलकापूर जिमखाना असोसिएशन व मलकापूर नगरपरिषद मलकापूरचे संयुक्त विद्यमाने प्लास्टिक निर्मूलन मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कृष्णा हॉस्पिटल पासून मोहिमेस सुरुवात झाली. त्यानंतर आगाशिवनगर परिसर ते ढेबेवाडी फाट्यापर्यंत प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे कामाचा शुभारंभ जिमखाना असोसिएशनचे अध्यक्ष मा. अशोकराव थोरात, मलकापूर नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते अजित थोरात मलकापूर जिमखाना असोसिएशनचे सर्व सहकारी तसेच मलकापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ नीलम येडगे,नगर परिषदेचे कर्मचारी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. परिसरातील नागरिकांनी मोहिमे संदर्भात समाधान व्यक्त केले. तसेच यापुढेही जिमखाना असोसिएशनच्या प्लास्टिक निर्मूलन मोहिमेस सहकार्य करू असे आश्वासन दिले.

सर्व सदस्यांनी सकाळी 7.30 ते 9.00 या वेळेत एक डम्पिंग इतका प्लास्टिक कचरा गोळा झाला. कचरा गोळा करताना कोणीही तो कचरा मी कसा गोळा करू असा विचार न करता, माझी जबाबदारी असे समजून केले. प्रत्येक सदस्यांना सुरक्षितता म्हणून हात मौजे, सॅनिटायझर, टी-शर्ट जिमखाण्याचे वतीने दिला गेला.संपूर्ण महाराष्ट्रासमोर प्लास्टिक निर्मूलनाचा एक आदर्श निर्माण करण्याचे काम मलकापूर जिमखाना यांच्यावतीने आज करण्यात आले.

 महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत,नगरपरिषद, शाळा,महाविद्यालय यांनीही प्लास्टिक कचरा निर्मूलन मोहीम राबवून संपूर्ण देश प्लास्टिक मुक्त करू असे आवाहन मलकापूर जिमखाण्याचे अध्यक्ष, शेतीमित्र मा.अशोकराव थोरात यांनी केले. पुढे ते म्हणाले प्लास्टिक कचरा हा माणसासाठी इतका घातक जीवघेणा आहे अनेक रोगांचे मूळ प्लास्टिक कचरा असून त्याचे उच्चाटन होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास अजित थोरात,सुधाकर शिंदे, संजय तडाखे, अण्णासो काशीद, भारत जंत्रे,भीमाशंकर माऊर, सुहास जाधव, दादासो कदम- गरुड,रामराव पाटील,पांडुरंग कदम, दिलीप पाटील, अंजली रैनाक, शशिकांत महापुरे, राजू मुल्ला, हिम्मत माने,दीपक पवार, सुहास कदम, सुनील भिसे,डॉ.सतीश सोनवणे, दुर्वास भोसले, एडवोकेट शरद पवार, दिगंबर वास्के,तानाजी शिंदे, मोहनराव शिंदे, नंदकुमार बागल, सुरज शेवाळे, विजय रैनाक, राजेंद्र चव्हाण, जयंत कुराडे, शहाजी पाटील, सागर जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.