ढेबेवाडी पोलिस स्टेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना वह्या वाटप.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
श्री वाल्मिकी विद्यामंदिर येथील वांगव्हँली वसतीगृह, तळमावले ता पाटण या ठिकाणी ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. ढेबेवाडी  पोलिस ठाण्याच्या वतीने गणपती उत्सव व नवरात्र उत्सवा मध्ये मंडळातील तरूण कार्यकर्त्यांना गोरगरीब, दीनदलित विद्यार्थांच्यासाठी वह्या देण्यासाठी आवाहन केल्याने याआवाहनाला प्रतिसाद देत मंडळातील कार्यकर्त्यांनी वह्या भेट म्हणून दिल्या 

 याच  श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले येथील सामाजिक न्याय विभागांतर्गतील शासकीय वांगव्हँली वसतिगृहातील मुलांना या सार्वजनिक मंडळाकडून जमा झालेल्या वह्या या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या. 

 यावेळी ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, PSI गणेश भोसले, गोपनीय विभागाचे नवनाथ कुंभार, प्राचार्य डॉ अरूण गाडे, चिखलेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच किशोर मोरे, साईकृपा ग्राफिक्सचे अक्षय सावंत, अधीक्षक वांग व्हॅली वसतिगृह तळमावले चे प्रविण सुतार, प्रा सचिन पुजारी सर उपस्थित होते.

यावेळी वांगव्हँली वसतिगृहाच्या वतीने मान्यवरांचे  व मंडळाचे स्वागत व सत्कार प्राचार्य डॉ अरूण गाडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ देऊन  करण्यात आले.

या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी म्हणाले की, आपण आपल्या आई वडिलांना व नातेवाईकांच्या पासून दुर येऊन आपण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात राहत आहात अत्यंत प्रामाणिकपणे, चांगला अभ्यास करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पुर्ण करा तसेच संस्थेच्या ब्रीदवाक्यचा आपल्या आयुष्यात उपयोग करून या स्पर्धेच्या युगात आपण आपल्या ध्येयापासून दुर न जाता प्रशासकिय अधिकारी किंवा पोलीस खात्यात चांगले अधिकारी बना असे ही या वेळी ते म्हणाले.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ गाडे म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी लिहिलेल्या स्वरचित प्रार्थनेचा अर्थ व तत्वज्ञान समजावून सांगितले तसेच महाभारतातील दानशूर कर्णाचे दानाबद्दलचे महत्त्व विशद केले तसेच  ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी यांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे मनापासून संस्थेच्या व दोन्ही संकुलाच्या वतीने आभार मानतो. 

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा सचिन पुजारी यांनी केले व आभार प्रविण सुतार यांनी मानले. यावेळी वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते..