यावेळी शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री माळी सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत केले. नंतर उपस्थित मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे एस व्ही यांनी शाल व बुके देऊन स्वागत केले.
या वेळी कै.हिंदुराव साळुंखे सर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील इयत्ता 5वीव 6वी च्या विध्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या भेट देताना.
कै साळुंखे सर यांचे सहकारी मालदन गावचे प्रा.अधिकराव कणसे सर यांनी कै साळुंखे सर यांच्या शिक्षणप्रवासा विषयी खूप आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाचे आभार श्री बी पी माळी सर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री माळी एस एस यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री राहुल साळुंखे सर, श्री अधिकराव कणसे सर, श्री शिवाजी पानवळ, श्री अरुण चव्हाण,श्री विश्वास पानवळ, माजी मुख्याद्यापक श्री डी आर पाटील सर, श्री हुळ्ळेसर, श्री व्ही एम साळुंखे शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे एस व्ही सर सर्व स्टाफ व विध्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.