स्वच्छ सर्वेक्षण अभियानां अंतर्गत कुंभारगाव मध्ये समितीकडून पाहणी.


राज्यस्तरीय समितीतील मान्यवरांचा सत्कार करताना सरपंच सारिका पाटणकर.

कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
स्वछ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत सातारा जिल्ह्यातील 15 उत्कृष्ट ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे.
कुंभारगांव ता.पाटण ग्रामपंचायतीने SSG पोर्टलवर राज्यस्तरीय नामांकनासाठी प्रस्ताव केला होता त्या अनुषंगाने 5000 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या कुंभारगाव   ग्रामपंचायतीची निवड झाली आहे.

राज्यस्तरीय समिती ( जि.प.धुळे ) सदस्य दिपक पाटील, संतोष नेरकर, प्रशांत देव, जिल्हा परिषेद सातारचे राजेंद्र भोसले,गणेश चव्हाण, पाटण पंचायत समिती चे स्वच्छता तज्ञ विनोद काळभोर,फिरोज मुलानी यांनी रविवार 9 जुलै रोजी कुंभारगाव ला भेट दिली.

यावेळी कुंभारगाव ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, मंदिर, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, प्राथमिक उप आरोग्य केंद्र, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व नाविन्यपूर्ण उपक्रम, पाणी पुरवठा विहीर यांची पाहणी केली व या बाबत ग्रामसेवक, सरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांचे कडून समिती कडून माहिती घेण्यात आली व समितीकडून अपेक्षित मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आले.यावेळी उपस्थित समितीतील मान्यवरांचे ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी कुंभारगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका पाटणकर, सदस्य किशोर चव्हाण,सदस्या वैशाली गुरव, प्रमिला घाडगे, विमल शिबे, पोलीस पाटील प्रविण मोरे, अमोल गायकवाड, अंगणवाडी सेविका, प्राथमिक उपकेंद्राच्या डॉ सुप्रिया यादव, ग्रामपंचायत कर्मचारी बाळासो चोरगे, अजित डांगे, सुभाष चोरगे, डॉ प्रदीप पाटील, महेश चव्हाण, महेश पाटील, विकास चव्हाण गुरुजी, ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.