वत्सला ट्रस्टतर्फे १३ हजार वह्यांचे वाटप



सणबुर | प्रमोद पाटील : वत्सला चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य मा रमेश पाटील साहेब यांनी जपली सामाजिक बांधिलकी ढेबेवाडी जिल्हा परिषद मतदार संघातील 44 गावांमधील 79 जिल्हा परिषद शाळेतील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना 13000 वह्यांचे वाटप केले असून गेली सात वर्षापासून चालू असलेली परंपरा कायम राखली असून यामुळे विभागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य फुलले आहे

      वत्सला चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी गेल्या सात वर्षांपासून या विभागातील जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थ्यांना वह्या ंचे वाटप केले जात असते हा विभाग डोंगराळ व दुर्गम विभाग आहे यामध्ये लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून तो सुद्धा बेभरोशाचा झाला आहे वाढत्या महागाईमुळे आर्थिक विवेचनामध्ये सापडलेल्या लोकांना  आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देणे सुद्धा परवडत नाही शासनातर्फे मोफत पुस्तके व गणवेश वाटप केले जाते तरीसुद्धा त्यांना महागाईमुळे वह्या सुध्दा घेने परवडत नाही म्हणून पाटील साहेब यांनी आपल्या विभागातील प्रत्येक विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षण मिळावे व त्यांच्या शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी वत्सला चारिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून अण्णासाहेब काळे व शिवाजी पाटील आणि इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने विभागातील 44 गावांमधील सुमारे 79 जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले आहे याबद्दल विभागातील नागरिकांनी ट्रस्टच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून ट्रस्टचे अध्यक्ष रमेश पाटील साहेब व उपाध्यक्ष सौ भारतीताई पाटील यांचे त्यांनी आभार मानले आहेत

____________________________________

या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांच्या अडीअडचणी समजल्या विकास कामाबरोबर वत्सला चारिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक सामाजिक व लोकापयोगी उपक्रम राबवत असून आपल्या मातीतील लोकांच्यासाठी केलेल्या काम मुळे समाधान मिळत असुन ट्रस्टच्या माध्यमातून या पुढील काळात सुद्धा या विभागातील लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे.

रमेश पाटील
माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा

___________________________________