श्री संतकृपा शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
घोगाव ता.कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी सहभागी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली.

डॉ. स्वानंद कुलकर्णी यांना आयुष मंत्रालयात नोंदणीकृत असलेल्या आंतरराष्ट्रीय योग संघटनेतर्फे 'आंतरराष्ट्रीय योग शिक्षक' म्हणून प्रमाणित केले आहे.

या कार्यक्रमात श्री संतकृपा शिक्षण संस्थेतील डिप्लोमा व B.Tech चे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

या वेळी श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी थोडक्यात आंतरराष्ट्रीय योगदिन व योगाचे महत्त्व सांगून योग प्रार्थनेने योगाचा प्रारंभ केला व पूरक हालचालीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यामध्ये उभे राहून करावयाची योगासने, बैठी योगासने, पोटावर व पाठीवर झोपून करावयाची योगासने याची प्रात्यक्षिके करून दाखवली त्याप्रमाणे सर्वांनी ती केली. त्याचबरोबर प्राणायम चे प्रकार ही करून दाखवले. शेवटी ध्यानधारणा, संकल्प व शांतीपाठ होवून योगासन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.



या योगादिन कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सहभागी होऊन अतिशय उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला.

 या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा डॉ उषा जोहरी व सचिव मा.प्रसुन जोहरी यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षक , शिक्षकेतर स्टाफचे अभिनंदन केले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.