चाळीस गद्दारांनी खोक्यासाठी शिवसेनेशी गद्दारी केली, निष्ठावंत शिवसैनिक त्यांना कधीही माफ करणार नाहीत: संजय राऊत


सणबूर | प्रमोद पाटील :
मुंबईमध्ये मराठी माणसाच्या अस्मितेसाठी व न्याय हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली त्याकाळी शिवसेनेला लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी ताकद देऊन सहकार्य केले मात्र त्यांच लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या घराण्यात शिवसेना फोडणारा गद्दार निघाला हे पाटण तालुक्याचे दुर्दैव म्हणावे लागेल अशी घणाघाती टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शंभूराज देसाई यांच्यावर केली.

      ते (गुढे)तळमावले ता पाटण येथील गणेश मंगल कार्यालय मध्ये आयोजित केलेल्या शिवसंवाद मेळाव्यात बोलताना केले यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, सचिन मोहीते, पाटण तालुका अध्यक्ष सचिन आचरे, सुरेश पाटील, रविंद्र पाटील, प्रविण शिंदे, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

        यावेळी बोलताना राऊत म्हणाले की अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकाभिमुख कारभार करणारे सरकार होते परंतु या 40 गद्दार आमदारांनी सरकार पाडण्याचे पाप केले यामध्ये एक गद्दार या पाटण तालुक्यातील निघाला आहे, हे पाटण तालुक्याचे दुर्दैव म्हणावे लागेल एक ही गद्दार 2024 च्यां निवडणुकीमध्ये निवडून येणार नाही शंभूराज देसाई यांना प्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी लाल दिवा दिला नंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना दुसऱ्यांदा लाल दिवा दिला तरीही त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करून शिवसेना फोडण्याचे पाप केले आहे त्यांना पाटण तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत येत्या निवडणुकीमध्ये पाटण तालुक्यामध्ये बदल केल्याशिवाय इथला शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही पाटण तालुक्यातील चित्र बघून २०२४ ला पाटण तालुक्यातील चित्र नक्कीच बदलेल असेल.

   ‌‌‌‌ जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ पण फौजदाराचा हवलदार म्हणून नाही अशा शब्दात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घनघनाती टीका त्यांनी केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह 40 गद्दारांनी गद्दारीचे खरे कारण अजून सांगितले नसून त्यांनी केवळ खोक्यासाठी शिवसेनेसी गद्दारी केली आहे याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला तर शिवसेना कोणाची हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनता ही निवडणुकीमध्ये तुम्हाला दाखवून देईल शिवसेना कोणाची आहे असा विश्वास त्यांनी यावेळी शेवटी व्यक्त केला.

     यावेळी बोलताना नितीन बानगुडे पाटील म्हणाले की, पाटण तालुक्यातील माणसे कडवट विचारांची आहेत,चाळीस आमदार गेलेत पण एकशे चाळीस आमदार निवडून आणण्याची ताकद या महाराष्ट्रातील जनते मध्ये आहे, महाराष्ट्र खरोखरच भाग्यवान आहे कारण या महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्या सारखा मुख्यमंत्री कोरोना काळात लाभला त्यामुळे कोरोना काळात अनेक लोकांचे प्राण वाचले व महाराष्ट्रातील जनतेला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढले, मिंदे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक ही उद्योग राज्याबाहेर गेले नाहीत पण आता अनेक उद्योग गुजरातला जात आहेत शिवसेनेचे नाव काढुन घेतले चिन्ह घेतले तरी शिवसेना कधीही संपणार नाही शिवसेनेतून गेले ते पीक होते आणि शिल्लक आहे ते बियाणे आहे एक पेरले तर अनेक उगवते असे ते शेवटी म्हणाले.

      यावेळी हर्षद कदम म्हणाले की पंचवीस वर्षां मध्ये शंभूराज देसाई यांनी भरपूर शिवसैनिकांना त्रास दिला आहे. आमच्या शिवसैनिकांना कधीच सन्मान दिला नाही परंतु आम्ही पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला त्याचे पालन केले,ज्यांनी वांरवार पक्षांच झेंडे बदले त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. तालुक्यात विकासाच्या बाता केल्या जात असून तालुक्या मध्ये केवळ रस्त्यांचीच कामे चालू असून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे ठेकेदार यांचा एक ग्रुप तयार केला असून या ठेकेदार ग्रुप ला पोसण्याचा उद्योग चालू आहे. आम्ही लवकरच त्यांची चौकशी लावुन त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश काळगावकर, सुत्रसंचालन प्राध्यापक दिपक तडाखे यांनी केले तर आभार दादासाहेब नलवडे यांनी मानले यावेळी ढेबेवाडी व कुंभारगाव काळगाव विभागातून मोठ्या संख्येने शिवसैनिक व महिला शिवसैनिक उपस्थित होते