कुंभारगाव येथे आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांची वारकऱ्यांच्या वेष भुषेत दिंडी.


कुंभारगाव | राजेंद्र पुजारी :
पंढरपूर आषाढी वारी साठी परराज्यातून, राज्यातून, जिल्हा, तालुका, गावागावातून असंख्य वारकऱ्याच्या दिंड्या एकादशी दिवशी पंढरपूरला दाखल होतात परंतु शाळेच्या विद्यार्थ्यांना वारी चा आनंद साजरा करता येत नाही.

 यानिमित्ताने प्राथमिक शाळा, हायस्कुल, अंगणवाडी, इंग्लिश मिडीयम या शाळेच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा दिंडी सोहळा शाळे पासून गांव प्रदक्षिणा करत ग्रामपंचायत आवारात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळत आनंद उत्सव साजरा केला. यावेळी वारकऱ्यांचा पारंपरिक पोशाख, नऊवारी साडी परिधान करून व विठ्ठल रखुमाईची वेष भुषा केलेले विद्यार्थी दिसून आले.



 या वेळी डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन विद्यार्थी गळ्यात टाळ, मृदंगाच्या निनादात हाती भगवा पताका घेत न्यानबा तुकाराम, ज्ञानेश्वर माऊलीचा , तुकारामाचा गजर करत भव्य गोल रिंगण करून सोहळा पार पडला.

  यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या दिंडी सोहळा प्रसंगी कुंभारगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सारिका पाटणकर, सदस्य किशोर चव्हाण, ग्रामस्थ युवराज चव्हाण, विजयसिंह चव्हाण, विजय गुरव, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.

  एकादशी निमित्त सोहळा यशस्वी कारण्यासासाठी शाळा, हायस्कुल, अंगणवाडी,सेविका, मुख्याध्यापिका व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.