संजय चव्हाण यांना आदर्श सेवक कर्मचारी सन्मानपत्र देऊन गौरव


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कृष्णा सहकारी बँक,जयवंतराव भोसले नागरी पतसंस्था, कृष्णा महिला पतसंस्था, कृष्णा आर्थिक परिवार यांचे कडून जर वर्षी उत्कृष्ट सेवक, उत्कृष्ट शाखा प्रमुख, यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येते.
 सन्मानपत्र हा त्या व्यक्तीच्या कर्तत्वाचा व त्याने केलेल्या चांगल्या कार्याचा सन्मान असतो असे मत बँकेचे चेअरमन अतुल भोसले यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
कुंभारगाव ता.पाटण येथील संजय हिंदुराव चव्हाण यांना कृष्णा सहकारी बँकेमध्ये उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल आदर्श सेवक कर्मचारी म्हणून बँकेचे चेअरमन अतुल भोसले यांचे हस्ते प्रशस्ती पत्र देऊन पुरस्कृत करण्यात आलेे.  
यावेळी कृष्णा बँकेचे चेअरमन अतुल भोसले, व्हा.चेअरमन दामाजी मोरे, कृष्णा सह साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले, संचालक, सि.ओ बी, आर, जाधव उपस्थित होते.