ढेबेवाडी विभागातील शवविच्छेदन गृहाच्या गैरसोयी बद्दल मारुतीराव मोळावडे यांनी उठवला आवाज.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सातारा येथे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठक पार पडली. या वेळी समितीचे सदस्य मारुतीराव मोळावडे यांनी ढेबेवाडी विभागातील विविध सामजिक प्रश्न मांडले.

या वेळी प्रामुख्याने मारुतीराव मोळावडे यांनी ढेबेवाडी विभागात शवविच्छेदन गृह नसल्याने होणाऱ्या गैरसोयी व विविध अडचणींबाबत प्रश्न मांडला. मृताच्या कुटुंबीय व नातेवाइकांना बसणारा आर्थिक भुर्दंड तसेच होणारा मानसिक त्रास दूर करण्याची अनेक वर्षांपासूनची दुर्लक्षित मागणी बैठकीत श्री.मोळावडे यांनी उचलून धरली.

या वेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने जागेची समक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.

याचबरोबर मारुतीराव मोळावडे यांनी अनेक समस्यांबाबत बैठकीत मुद्दे मांडले यामध्ये ढेबेवाडी ते कराड रसत्याचे केबलसाठी केलेल्या खुदाईत झालेले नुकसान, दुभाजक व त्यातील झाडे तसेच अँटी ग्लेअरची उपद्रवीकडून सुरू असलेली नासधूस, प्राथमिक शाळांत विद्यार्थ्यांना पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका होऊ नये, यासाठी शाळांना संरक्षक भिंती आणि खिडक्यांना जाळ्या बसविणे, उपद्रवीकडून शाळांची होणारी नासधूस टाळण्यासाठी उपाययोजना शोधणे त्याबद्दलही त्यांनी सविस्तर मुद्दे मांडले.