माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांना अल्पोहार वाटप; माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा उपक्रम


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आळंदी दिघी रोड येथे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांना अल्पोहार (केळी, बिस्कीट,पाणी,सफरचंद)वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला संस्थापक ह.भ.प.दत्तात्रय पिंपरे महाराज,अध्यक्ष संदीप उतेकर, मारुती पार्टे, संतोष संकपाळ, अंकुश उतेकर, एकनाथ उतेकर, स्वराज्य फाऊंडेशन सर्व महिला/पुरुष पदाधिकारी,यांच्यासह नितेश जाधव,रांगोळीकर अजय जाधव, राम शिंदे, पत्रकार भिमराव धुळप, सुनील जाधव आदी मंडळी तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  गेली दहा वर्षे माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळ,निपाणी जावळी तालुका मधील हे वारकरी बांधव ही सेवा करत आहेत,काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने आणि जेथे कमी तेथे आम्ही असे समजून हा अल्पोहार वाटपाचा कार्यक्रम आळंदी दिघी रोड येथे केला जातो.त्यानंतर दुपारी आळंदी येथे जाऊन माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन पुन्हा मुंबईकडे प्रस्थान करत असतात.