चेंबूरमध्ये ठाकरे गटाच्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा विक्रमी प्रतिसाद


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आदित्य स ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी थॅलेसिमिया आजारग्रस्त रुग्णांसाठी चेंबूर मधील घाटले गावदेवी मैदान हॉलमध्ये विशेष भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिराला रक्तदात्यांनी विक्रमी प्रतिसाद दाखविला. 

या रक्तदान शिबिराला साधारणपणे ५०० रक्तदात्यांनी हजेरी लावली होती.तसेच अती उष्णतेमुळे व शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्यामुळे ४०-५० जणांना रक्तदान करता आले नाही.या शिबिराच्या पार्श्‍वभूमीवर 

 प्रसिद्ध कलाकार आदेश बांदेकर रीना मधुकर ,भाऊ कदम ,विजय गोखले,भारत गणेशपुरे,गणेश मायेकर,

श्याम राजपूत,अंशुमन विचारे अशा दिग्गज कलाकारांनी रक्तदात्यांना सोशल मीडियातून आवाहन केले होते.या रक्तदान शिबिराला ठाकरे गटाचे उपनेते,आमदार सचिन अहिर यांनी देखील उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले आणि थॅलेसिमिया रुग्णांसाठी काम करणाऱ्या 'साथ" या संस्थेला १ लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली.यावेळी विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, आमदार प्रकाश फातर्पेकर विधानसभा संघटक निमेश भोसले युवा सेना सहसचिव किरण लोहार,समाजसेविका मीनाक्षी पाटणकर आणि ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.