कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
शेंडेवाडी कुंभारगाव (ता. पाटण) येथे जळीतग्रस्त चार कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य आगीत जळून भस्मसात झाले होते. त्या जळीतग्रस्त कुटुंबांना चंद्रकांत चाळके युवा मंच तर्फे संसारोपयोगी साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत शेंडेवाडी ता.पाटण येथील चार पवार कुटुंबांचे सर्व सामान व अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्याची राख झाली. त्यात १६ लाखांचे नुकसान झाले होते. त्या मुळे संसार उपयोगी साहित्याचे वाटप केल्याने चंद्रकांत चाळके यांचे उपस्थितांनी आभार मानले.
या मध्ये चमचा पासून ते घागरी पर्यंत संसार उपयोगी भांड्यांचे वाटप करण्यात आले.
या वेळी शिवसेना ऐरोली विभाग प्रमुख चंद्रकांत चाळके, सह्याद्री बँक मुंबईचे उपाध्यक्ष सुरेश पवार, गलमेवाडीचे माजी सरपंच दत्तात्रय चोरगे, शेंडेवाडीचे सरपंच राहुल मोरे, समाजसेवक आप्पासो मोरे,आप्पासो निवडुंगे, माजी उपसरपंच भरत चाळके, चाळकेवाडी तंटा मुक्त अध्यक्ष्य अशोक चाळके, साईराज संस्थेचे सदस्य अशोक मोरे, अशोक चाळके तात्या, समाजसेवक विनायक चाळके व चाळकेवाडी, शेंडेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.