राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २४वा वर्धापन दिन कुंभारगाव - काळगाव विभाग राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी सारंग पाटील व प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
कुंभारगाव - काळगाव विभाग राष्ट्रवादी काँग्रेस व राजे संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त विभागातील दहावी व बारावी परिक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सारंग पाटील यांच्या शुभ हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन त्यांचा सत्कार केला व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सारंग पाटील यांचा सत्कार करताना योगेश पाटणकर समवेत रमेश मोरे.
याप्रसंगी राजे संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटणकर, रमेश मोरे-बापू, रघुनाथ जाधव-तात्या, मारुती मोळावडे, माधवराव पानवळ, अंकुश मोंडे, सुंदर पुजारी, जितेंद्र चोरगे, श्रीरंग चाळके, बाबासो मोरे, आनंदा नायकवडी, अमोल मोरे, किशोर मोरे अन्य मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.