उद्या पाटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
इयत्ता 10 वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना करिअरच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या वतीने या करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दहावीनंतर तुम्ही जी शाखा निवडतात यावर तुमच्या करिअरची दिशा ठरते. यासाठी करियर मार्गदर्शन फार महत्वाचे आहे. या मुळे विद्यार्थ्याला त्याची आवड व कल ओळखण्यासाठी मदत होते.

सदर शिबिराचे आयोजन शनिवार दि. 17 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण येथील ए.पी जे. अब्दुल कलाम हॉल येथे करण्यात आले आहे.

 प्रमुख वक्ते शिक्षण तज्ञ डॉ. दिलीप देशमुख व प्रा.श्री.ऋषिकेश भांबुरे, (ॲनिमेशन विभाग प्रमुख, वाय. सी. कॉलेज, सातारा ) हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कोयना शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर तर प्रमुख पाहुणे सातारा जिल्हा मध्य. सह. बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर  यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच कोयना शिक्षण संस्थेचे संचालक याज्ञसेन पाटणकर व संजीव चव्हाण हे उपस्थित असणार आहेत.

करिअर मार्गदर्शन शिबिरीसाठी पाटण तालुक्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.