पाटण तालुक्यातील पोलीस पाटील रिक्त जागेसाठी लेखी, तोंडी परीक्षा पार पडल्या यामध्ये नवनियुक्त पोलीस पाटील यांची निवड करण्यात आली.
कुंभारगांव : अमोल अनिल गायकवाड, काढणे : सायली राजू नांगरे, चव्हाणवाडी (धामणी) : कविता अधिक चव्हाण, डाकेवाडी (काळगांव) : गणेश तुकाराम डाकवे, कोळेकरवाडी : मनीषा हणमंत महाडिक, पाणेरी: अण्णासो दगडू अनुसे, पापर्डे खुर्द: साईदास मोहनराव कांबळे, वाटोळे: दर्शना अशोक पवार, घाणबी: नितेश सिताराम चव्हाण, लुगडेवाडी: प्रकाश चंद्रकांत लुगडे, आसवलेवाडी : नितीन सर्जेराव आसवले. या नवनियुक्त पोलीस पाटील यांना प्रांताधिकारी सुनील गाढे यांचे हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी पोलीस पाटील यांनी बजावायची कर्तव्य, घ्यावयाची सावधानता आदी बाबत मार्गदर्शन केले तसेच ते म्हणाले की पोलीस पाटील प्रशासनाचा एक मूलभूत घटक असून त्यांनी आपली जबाबदारी, कर्तव्य तटस्थपणे पार पाडावीत यामध्ये येणाऱ्या अडचणी मध्ये महसूल विभाग त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे सध्या कार्यरत असणारे पोलीस पाटील वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणारे असून त्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा इतर पोलीस पाटील यांना कसा होईल यासाठी प्रयत्न करावा कोरोना काळात विविध योजना राबवण्यासाठी पोलीस पाटील यांनी महत्वाची भूमिका, मदतकार्य केले होते त्यांच्या या कार्याचा आदर्श नवनियुक्त पोलीस पाटील यांनी घ्यावा व आपले कर्तव्य बजवावे.
यानंतर सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जनसंपर्क प्रमुख अमित शिंदे बोलताना म्हणाले की, प्रांत साहेब पोलीस पाटील यांच्या पाठीशी ठाम असतात त्यांनी अडचणीच्या वेळी योग्य मार्गदर्शन केले असून त्यांनी दिलेल्या जबादाऱ्या पोलीस पाटील यांनी पार पडल्या होत्या या पुढील काळात प्रांत साहेबाच्या मार्गदर्शना खाली सर्व पोलीस पाटील यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वी पने पार पडू अशी ग्वाही दिली.
कार्याध्यक्ष नितीन पाटील बोलताना म्हणाले, या आधी नियुक्ती प्रमाणपत्र पोस्टाने किंवा गावकामगार तलाठी यांचे हस्ते पोलीस पाटील यांना मिळत असत परंतु प्रांता अधिकारी गाढे साहेबानी पहिल्यादा स्वतःच्या हस्ते या नवं नियुक्त पोलीस पाटील यांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला याचा आम्हा सर्व पोलीस पाटील यांना सार्थ अभिमान आहे तसेच आपण दिलेली कौतुकाची थाप आम्हा सर्व पोलीस पाटील यांना पुढील काळात नवसंजीवनी, प्रेरणा देत राहील.
सदर कार्यक्रमास पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा कार्यकारणी जनसंपर्क प्रमुख अमित शिंदे, कार्याध्यक्ष नितीन पाटील, ए, ए, मुलाणी तालुक्यातील नवनियुक्त पोलीस पाटील उपस्थित होते.
__________________________________
पोलीस पाटील प्रशासनाचा एक मूलभूत घटक असून त्यांनी आपली कर्तव्य तटस्थपणे पार पाडावीत,
- प्रांताधिकारी सुनील गाढे
__________________________________