सूरज चव्हाण यांनी वाढदिवसानिमित्त जोपासली सामाजिक बांधिलकी.


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:            
कुंभारगाव ता.पाटण येथील डॉ. दिलीपराव चव्हाण यांचे चिरंजीव युवा उद्योजक सुरज दिलीपराव चव्हाण यांचा वाढदिवस नुकताच पार पडला. यावेळी त्यांनी सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला.

वाढदिवसानिमित्त त्यांनी श्री लक्ष्मी देवी हायस्कुल कुंभारगाव येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती कराळे, शिक्षक, लोकनेते बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, सौ.सत्वशीला चव्हाण, सुरज चव्हाण, सौ.ऋतुजा चव्हाण, अनिल डांगे व उमेश घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी सूरज चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छया दिल्या.