टीम गुणवंतगड पाटण यांच्याकडून विशेष दिशादर्शक फलक मोहीम.



पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
टीम गुणवंतगड, सातारा आयोजित गुणवंतगड दिशादर्शक फलक श्रमदान मोहिमे रविवारी पाटण ते मोरगिरी येथे पार पडली. गुणवंतगडाच्या माचीवरील ८ वस्तूंना योग्य त्या माहिती नुसार त्यांच्या इतिहासिक नावावरून फलक लावण्यात आले.

पाटण ते किल्ले गुणवंतगड या मार्गावर ६ दिशादर्शक फलक लावण्यात आले. फलक लावण्याचा मुख्यउद्देश हाच की गुणवंतगड ला येणाऱ्या बऱ्याच भटकंती दुर्गप्रेमी करणाऱ्या पर्यटकांना ह्या गडविषयी महिती होत नाही किंवा माहिती मिळत नाही पाटण पासून ७ किलो मीटर अंतरावर असलेला हा टेहाळनीचा मुख्य राज्यमार्गा वर देखरेख ठेवण्यासाठी असलेला दुर्ग म्हणजे गुणवंतगड पेशवे काळात या गडावर शिबंदी होती, आणि हा दुर्ग लोकांच्या निदर्शनात यावा म्हणून हा टीमचा एक छोटासा प्रयत्न गडाखली एक मोठा फलक लावण्यात आला, त्याच्यावर गडाची माहिती व गडाचा नकाशा दाखवला आहे. व तालुक्यातील विरघळ स्मारक यांचे ही फलक लावण्यात आले.

पाटण (रामपुर) येथे किल्ले दातेगड किल्ले गुणवंतगड, विरघळ स्मारक यांचे दिशा दाखवणारे फलक लावण्यात आले. मोरगीरी गावच्या पोलिस पाटील मॅडम यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. टीमला सहकार्य करणारे साने काका यांची उपस्थिती होती. विषेश सहकार्यः मुजमिल बशीर खोदू यांनी केले.

सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पाटण तालुका, मोरगिरी गावचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत मोरगिरी, सरपंच आणि किल्ले मोरगिरी गावचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

गुणवंतगडाचे अखंडित संवर्धन कार्य मावळ्यांच्या हातून यापुढेही निरंतर सुरू राहील असे टीम गुणवंत गड सातारा यांनी आवर्जून सांगितले.

किल्ले गुणवंतगड गडावर अखंडित संवर्धन कार्य चालू राहील तसेच येत्या काळात गडावर मोठ्या उंचीचा परम पवित्र भगवा ध्वज उभारण्याचे काम व मोरगिरी विरघळ स्मारक यांचे प्रस्तावित कामं पुर्णत्वास घेऊन जाणार आहे असे मत स्वराज्यकार्य परिवार व टीम गुणवंतगड प्रमुख श्री मावळा सागर कदम मुकादम यांनी व्यक्त केले. या मोहिमेसाठी लकी लांभोर, अभिषेक साळुंखे फौजी, सुशांत फडतरे यांनी मोठं योगदान दिले

___________________________________
ध्यास एकच माझ्या थोरल्या धाकल्या धन्याचे चरणकमल ज्या ज्या ठिकाणी पडले तो प्रत्येक चिरा संवर्धित करायचा.
- टीम गुणवंत गड सातारा 
___________________________________